Sunday, 21 February 2016





मित्रांनो
जेव्हा बागेतल्या घसरगुंडी वरून उलटी वर चढणारी मुले पाहिली तेव्हांच मला लक्षात आलं
समाज अन समाजमन बदलतंय उलट त्यांचं कौतुक, त्यांना पाठींबा मिळतो 
अन धाडसा बद्दल कौतुक. 

परत ते वरून रीतसर घसरत येणार्या मुलांची करणारी अडवणूक अन दुसर्याच्या आनंदात 
खोडा घालून आपला आनंद द्विगुणीत करणे अजबच. त्यांच्याकडेही पालक खुशीनंच बघतात ...
खूप आधी असे नसावे असे वाटते ...

मग होतातच तयार दुष्ट नागरिक ...
मोठेपणी ते रॉंग साइडने जाणे किंवा सिग्नल तोडून दिवसाची सुरुवात करणे 
इथपासून ते अनेकानेक अजब गजब कारनामे सहजगत्या अंगवळणी पडून 
हेच लई भारी असतं असे सांगून आपल्यासम जास्तीत जास्त कसे तयार होतील ते बघणे ...

त्यातून एखादा वाकडा चालताना जाणवलाच तर जरा सुद्धा त्याच्या निदर्शनात आणून देऊ नका ...
कारण सोप्पय 
लगेच पन्नास जण तयार असतातच तुमच्या अंगावर खेकसायला तुझी नजरच वाकडीय भाड्या म्हणून
असो
अन असे झाले कि मग होतं ते टांगा पल्टी घोडे फरार

जो पर्यंत ...
पृथ्वी, चंद्र, सूर्यादी सगळे आपापली मार्ग क्रमणा 
आपल्याच गतीने आपल्याच मार्गातून नियमित पणे करतायत ...
तो पर्यंत आपण निर्धास्त ...

त्यातही अधूनमधून वक्री होणारे असतातच पण तेही नियमानुसार त्याच्यात अनियमितता नाही ...

हे तर युगानुयुगे होतंय अगदी परमेशाच्या स्वताच्या जीवनातही 
हेच होत आलय
म्हणून तर साधू संतानी त्याची वर्णने अन जीवनसार वर्णन केलय 
आपल्या साठी त्यांनी स्व: अगदी त्या पद्धतीने जगून दाखवलय
जणू काही जीवनाचे गाईड किंवा २१ अपेक्षित प्रश्नसंच म्हणाना ….

त्यांना माहितीय माणसाला प्रश्न स्व: सोडवायचे नसतात 
आयती उत्तरे पाहुन सोडवणारेच अधिक 
अन स्वकष्टाने शोधु पहाणार्यांना अडवणूक किंवा पीडा देणारेच अधिक ...
मग तो राम असो, कृष्ण असो अथवा राजपुत्र सिद्धार्थ 
त्यांच्या वेळीही होतीच कि घसरगुंडीवरून उलटी चढणारी 
किंवा मार्गात येउन पाडणारी मुले
पण त्यांनी आपापली मार्ग क्रमणा आपल्याच मार्गान केली. 

एव सांगेन
जंगलजीम वर उलटे लटकून फारकाळ राहता येत नाहीअंजन आहे सद्य परिस्थिती बाबत...

आनंद आहे

सुखी असा !

5 comments:

  1. GA encha lekh wachlyasarkhe watle re! Chaan!

    ReplyDelete
  2. GA encha lekh wachlyasarkhe watle re! Chaan!

    ReplyDelete
  3. अजित,
    छोटासा वाटणारा अवगुण आता मोठी सामाजिक समस्या बनला आहे.
    तुझ त्यावरील भाष्य पटल. कमीतकमी शब्दात बरच लिहण्याची शैली पण आवडली.

    ReplyDelete
  4. अजित,
    छोटासा वाटणारा अवगुण आता मोठी सामाजिक समस्या बनला आहे.
    तुझ त्यावरील भाष्य पटल. कमीतकमी शब्दात बरच लिहण्याची शैली पण आवडली.

    ReplyDelete
  5. Very precise and apt Ajit sinh! The style of presenting the current mass psychology and relating it with the actual facts does reflect a very unique shade of article. I liked it very much! Appreciate it!

    ReplyDelete